logo

2009च्याचRTEकायद्याचीअंमलबजावणी करण्यासाठी,महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन......

धडाकेबाज युवा प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा समाजसेवक श्री.अमोल धनराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनेक सामाजिक संस्था यांच्या पाठिंब्याने दि.4/03/2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला शासकीय विश्रामगृहाच्या समोर ठाणे,महाराष्ट्र. येथे लक्षवेधी धरणे आंदोलनाला सुरवात होणार आहे.मा.मुख्यमंत्री साहेब,व जिल्हाधिकारी साहेब यांना 16/02/2024 रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब,वंचित,अपंग,दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी या लक्षवेधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.सदर आंदोलनात दि.4ऑगस्ट2009 रोजी संसदेत पारीद झालेल्या RTE(राईट टू एज्यूकेशन)कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत25% गोरगरीब, वंचित, दुर्लभ घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधीकार मिळावा.पंजाब कर्नाटक च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने RTE मध्ये केलेला बदल रद्द करावा.अशा RTE संबधित अनेक मागण्याचा यात समावेश आहे.

21
1515 views